Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस तालुक्यातील गुरसाळे येथील जि प शाळेत विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा सन्मान

माळशिरस तालुक्यातील गुरसाळे येथील जि प शाळेत विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा सन्मान 

नातेपुते प्रतिनिधी : आय एस ओ नामांकन जिल्हा परिषद शाळा गुरसाळे ता. माळशिरस या शाळेत शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला प्रथम प्रभारी मुख्याध्यापक चंद्रशेखर शिवगुंडे यांनी देशाचे माझे राष्ट्रपती व आदर्श शिक्षक  डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी मुलांना माहिती सांगितले नंतर मुला मुलींनी  सर्व शिक्षक व शिक्षिका यांचा  पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी प्र. मुख्याध्यापक  चंद्रशेखर शिवगुंडे , श्रीमती मनीषा बळे , विजय साळवे , श्रीमती माया काटे , श्रीमती लता मोरे , प्रमोद भोसले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश घाडगे, पत्रकार विलाास भोसले, ग्रामपंचायत सदस्य चांगदेव खिलारे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments