तुळजापुर तालुक्यातील काटी येथील प्रशाला व प्राथमिक शाळेत दहिहंडीचा उत्सव आनंदात साजरा
==================================
तुळजापुर : तालुक्यातील काटी येथील प्रशाला व प्राथमिक शाळेत दहीहंडी उत्सव व गोपाळ काला उत्सव आनंदात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी गोपाळ काल्याचा मनमुराद आनंद लुटला.शाळेचे गोविंदा पथक यांनी अथक परिश्रमातुन गोविंदा पथक रचले.चौथ्या प्रयत्नात यशस्वी दहीहंडी फोडली.बालकृष्णाची सुंदर वेशभुषा ही निलराज नारायण आगलावे या विद्यार्थ्यांने केली होती. दहीहंडी उत्सवासाठी सुंदर ,आकर्षक रांगोळी शालेय परिसरात काढण्यात आली होती.कार्यक्रमातुन राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागुन सर्व धर्म सहिष्णुता,सामंजस्य,प्रेम,खिलाडुवृत्ती,समायोजन,सहनशिलता या मुल्यांची पेरणी विद्यार्थ्यात झाली.गोविंदा पथकामुळे आनंद,उत्साह वाढीस लागुन धार्मिक सौदर्य,सलोख्याची भुमिका विद्यार्थ्यांत यशस्वी रुजली गेली.पथक रचताना ताकत,समुहशक्ती,संघटन,एकता,सहिष्णुता,सहनशिलता ही वाढीस लागली.संयम वाढीस लागुन शिस्त निर्माण झाली.
या कार्यक्रम यशस्वीते साठी मुख्याध्यापक हणुमंत कोळी,सत्यवान रसाळ, वैशाली पवार,पंकज कासार काटकर,अजित इंगळे ,दैवशाला कांबळे,समिना सय्यद,वैशाली क्षिरसागर,गुरुप्रसाद भुमकर,हणुमंत कदम,राहुल सुरवसे,नागेश भोसले, यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments