Hot Posts

6/recent/ticker-posts

चौथ्या नॅशनल फेडरेशन सॉफ्ट टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राची कांस्य पदकाची कमाई,महाराष्ट्र संघात धाराशिवच्या प्रियांका हंगरगेकर यांचा सहभाग

चौथ्या नॅशनल फेडरेशन सॉफ्ट टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राची कांस्य पदकाची कमाई,महाराष्ट्र संघात धाराशिवच्या प्रियांका हंगरगेकर यांचा सहभाग

 तुळजापुर प्रतिनिधी: अहमदाबाद (गुजरात) येथे पार पडलेल्या ४ थ्या नॅशनल सॉफ्ट टेनिस फेडरेशन स्पर्धेत मुलींच्या महाराष्ट्र संघाने दमदार कामगिरी करत प्रथमच कांस्यपदकाची कमाई केली.दि. २७ ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. यात देशभरातील गुणानुक्रमे प्रथम आठ राज्याचे संघ सहभागी झाले होते. रोटेशन पद्धतीने खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत मुलींचा महाराष्ट्र संघ तृतीय स्थानी राहून कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

महाराष्ट्र संघात प्रियांका हंगरगेकर (धाराशिव), ज्योत्स्ना मदने (सोलापूर), आयुषा इंगवले (पुणे), विनिता खेदार (बुलडाणा), प्राप्ती पाटील (कोल्हापूर), सोनल कचरे (बुलडाणा), अयाती दंदाडे (पुणे) यांचा सहभाग होता.प्रशिक्षक रविंद्र सोनवणे (मुंबई) यांचे मार्गदर्शन संघाला लाभले. महाराष्ट्र संघाच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष सुनिल पूर्णपात्रे, सचिव रविंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष संदीप गंगणे, जिल्हासचिव शिराज शेख, प्रशिक्षक संजय नागरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. 


Post a Comment

0 Comments