Hot Posts

6/recent/ticker-posts

लोक अदालत मध्ये मोटर अपघाताच्या प्रकरणात वृद्धेस ३२ लाखांचा धनादेश, लोकअदालतीत समेटातून १५ कोटी ५९ लाख रुपयाची तडजोड भरपाई

लोक अदालत मध्ये मोटर अपघाताच्या प्रकरणात वृद्धेस ३२ लाखांचा  धनादेश, लोकअदालतीत समेटातून १५ कोटी ५९ लाख रुपयाची तडजोड भरपाई


धाराशिव: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार दि,९ रोजी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीस पक्षकार व विधीज्ञाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला , यामध्ये एका मोटर अपघात प्रकरणांमध्ये तडजोडीत पक्षकार वृद्धेस  32 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

विशेष म्हणजे या प्रकरणातील पक्षकार ही वयोवृद्ध महिला असल्याने प्रमुख न्यायाधीश अंजू. एस. शेंडे व पॅनल प्रमुख आर.एस .गुप्ता यांनी पहिल्या मजल्यावरून खाली येत मुख्य प्रवेशद्वारासमोर तडजोडीचा धनादेश वयोवृद्ध महिलेकडे सुपूर्द केला. यामध्ये अर्जदाराच्या वतीने ऍडव्होकेट एम बी माढेकर तर विमा कंपनीकडून एडवोकेट अजित दानवे, यांनी काम पाहिले होते. तसेच धाराशिव येथील लोक अदालतीत दोन वैवाहिक प्रकरणांमध्ये यशस्वीरित्या तडजोड होऊन सन 2021 पासून पति व पत्नी विभक्त राहत असलेल्या प्रकरणांमध्ये आज त्यांच्या समेट घडवून दोन्ही प्रकरणातील महिलांना सासरी नांदावयास पाठविले.

जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या एकूण 57 हजार194 व दावा पूर्व एकूण 24 हजार 969 प्रकरणे सामोपचाराने  मिटवण्याकरता या लोक अदालतीमध्ये  ठेवण्यात आले होते. त्यापैकी प्रलंबित एकूण 1351 व दावा पूर्व 2350 प्रकरणे तडजोडी अंतिम निकाली काढण्यात आलेली आहेत. यामध्ये प्रलंबित दिवाणी स्वरूपाची (786), मोटार अपघात /कामगार नुकसान भरपाई प्रलंबित प्रकरणे,(59) भूसंपादन प्रलंबित प्रकरणे (13) , फौजदारी तडजोड पात्र स्वरूपाची प्रलंबित (18), वैवाहिक संबंधित प्रलंबित प्रकरणे (13), धनादेशाची प्रलंबित प्रकरणे(155), बँकेची प्रलंबित (83), बँकेची वाद पूर्व प्रकरण(181), नगरपालिका व ग्रामपंचायत ची पाणीपट्टी व घरपट्टीचे वाद पूर्व प्रकरणे (2805), ग्राहक तक्रार निवारण आयोगाची प्रकरणे (07) सामोपचाराने मिटवण्यात आली. तसेच गुन्हा कबुलीच्या 230 प्रकरणांमध्ये आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.


लोक अदालतीत समेटातून 15 कोटी 59 लाख रुपयांची तडजोड भरपाई

येथील या लोक अदालतीत मोटार/ अपघात कामगार नुकसान भरपाई प्रकरणामधील पक्षकारांना रुपये दोन कोटी 86 लाख 58 हजार मुस्कान भरपाई देण्याबाबत तडजोड झाली. धनादेश प्रकरणी फिर्यादी पक्षाला तीन कोटी 80 लाख 92 हजार 924 रुपयाची वसुली करून देण्यात आली. भूसंपादन प्रकरणांमध्ये तीन लाख 80 हजार 950 तडजोड करण्यात आली, दिवाणी स्वरूपाच्या प्रलंबित प्रकरणात 73 लाख 32 हजार 955 रुपये फौजदारी तडजोड पात्र स्वरूपाची प्रलंबित प्रकरणांमध्ये अकरा लाख रुपये तर बँकेच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये दोन कोटी 12 लाख 26 हजार 119 व बँकेच्या वाद पूर्व प्रकरणांमध्ये दोन कोटी ते 30 लाख 17 हजार 273 इतकी रक्कम तडजोडीत वसूल करण्यात आली आहे तसेच अनेक प्रकरणात रात्री उशिरापर्यंत कामकाज चालू होते असे वसंत यादव यांनी कळवले

Post a Comment

0 Comments