Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा आंदोलनवर जालना जिल्ह्यातील घटनेचा धाराशिवमध्ये पडसाद,छावा संघटनेने तीव्र शब्दात निषेध

मराठा आंदोलनवर जालना जिल्ह्यातील घटनेचा धाराशिवमध्ये पडसाद,छावा संघटनेने तीव्र शब्दात निषेध

प्रतिनिधी रूपेश डोलारे धाराशिव 


धाराशिव: मराठा आंदोलनवर जालना जिल्ह्यातील घटनेचा धाराशिव मध्ये पडसाद उमटले छावा संघटनेने तीव्र शब्दात निषेध नोंदवला . मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनावर जालना येथील अंतरवली येथील आंदोलन कर्त्यावर  लाठीहल्ला करणाऱ्या पोलीस अधीक्षक तुषार दोशी या पोलीस अधिकाऱ्यावर चौकशी करून सदरील पोलीस अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे म्हणून अखिल भारतीय छावा संघटना धाराशिव तर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब गृहमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांना पोलीस अधीक्षक साहेब धाराशिव व आनंद नगर पोलीस निरीक्षक साहेब यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

 यावेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके , कळंब तालुकाध्यक्ष विठ्ठल , धाराशिव तालुकाध्यक्ष रोहित पाटील, छावा संघटक अमोल गोरे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या घटनेचा धाराशिव शहरांमध्ये तीव्र निषेध

Post a Comment

0 Comments