पहाट कार्यक्रमातून पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार -पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी
आज पारधी आणि विमुक्त जाती-जमाती व भटक्या जमातीसाठी मार्केट यार्ड येथे आयोजित शिबीरात ते बोलत होते. श्री .कुलकर्णी म्हणाले, पारधी समाजाच्या उद्धारासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे मिशन पहाट या कार्यक्रमांतर्गत मुलांना पोलिस भरती आणि भरतीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे.येणाऱ्या नवीन पिढीला चांगले शिक्षण,प्रशिक्षण आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,तहसीलदार शिवानंद बिडवे,अपर तहसीलदार निलेश काकडे,पोलिस निरीक्षक शेख, मुख्याधिकारी वसुधा फड व सुनिल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments