Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण संपन्न

छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण संपन्न

धाराशिव : छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव येथे हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षणविस्तार अधिकारी दैवशाला हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.आठवी ते बारावी वर्गातील निबंध,वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांमध्ये  यश प्राप्त करणार्या विद्यार्थ्याना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवीण्यात आले.यावेळी हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे झुंजार सेनानी भाई उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दैवशाला हाके यांनी सर्वांगीण विकासामध्ये विविध स्पर्धा व गुणवत्ता विकास यांचे महत्व विशद केले.राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय पाटील यांनी मुक्तीसंग्रामातील मराठवाड्यातील जनतेने दिलेला अभूतपूर्व लढा आणि या लढ्यातील भाई नरसिंगराव देशमुख व भाई उद्धवराव पाटील यांचे अतुलनीय योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाचे प्रास्तावीक विनय देशमुख यांनी केले.तसेच सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन आण्णासाहेब कुरूलकर यांनी केले.यावेळी आदर्श प्राथमिक विद्यामंदीरचे मुख्याध्यापक एन. व्ही. शिंदे,उपमुख्याध्यापक देटे एन.एम.,पर्यवेक्षक व्ही.के.देशमुख उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

Post a Comment

0 Comments