Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : महाळंगी शिवारात जुगार अड्ड्यावर धाड,१० जणांना अटक,१५ लाख ४२ हजार ४५० रुपयाचा मुद्देमाल जप्त

धाराशिव : महाळंगी शिवारात जुगार अड्ड्यावर धाड,१० जणांना अटक,१५ लाख ४२ हजार ४५० रुपयाचा मुद्देमाल जप्त

धाराशिव : तालुक्यातील महामाळंगी शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवत असताना  10 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 15 लाख 42 हजार 450 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे  सदरची कामगिरीही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळंब येथील पोलिसांनी केली आहे . याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की  धाराशिव जिल्हा हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करणेकामी दि,15 रोजी  खाजगी वाहनाने रवाना होवुन पोस्टे बेंबळी हद्दीतील चिाखली गावात आल्यावर गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की मौजे महाळंगी येथे बाबासाहेब शिवाजी आगळे याचे शेतातील एका पत्रयाचे शेड मध्ये तिरट नावाचे जुगार खेळत व खेळवित आहे सदर ठिकाणी छापा मारण्यात आला आहे.

यामध्ये मिळून आलेले इसम  बाबासाहेब शिवाजी आगळे वय 38 वर्षे, रा. महाळंगी ता.जि. धाराशिव,  विकास पोपट मुंडे वय 30 वर्षे, रा. येडशी ता.जि. धाराशिव, किशोर बाळासाहेब गावकरे, वय 21 वर्षे, रा. नादुरगा, ता. जि. धाराशिव,  महादेव बुरु धर्मे, वय 34 वर्षे, रा. शिवाजी नगर बेंबळी ता. जि. धाराशिव, विकास दिलीप गावडे, वय 32 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव,  प्रकाश गौतम कोळगे, वय 36 वर्षे, रा. नादुरगा, ता.जि. धाराशिव, अमर सुरेश पवार, वय 30 वर्षे, रा. येडशी ता.जि. धाराशिव,  अनवर महंमद शेख, वय 39 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव, शाहदुतुला इनायतुला सय्यद, वय 30 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव, 10) मोहन राम जवळीकर, वय 40 वर्षे, रा. जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशिव असे एकुण 10 इसम मिळून आले त्याचे कब्जात एकुण रोख रक्कम 53,450₹ मोबाईल(10) -1,63,000₹ दोन चारचाकी वाहने (02)- 13, 00,000 ₹ असे एकुण 15,42,450₹ चा मुद्देमाल मिळून आल्याने पोउपनि श्री. गोडसे यांनी पंचनामा करुन जप्त केलेले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, यांचे आदेशाने अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत उस्मानाबाद मा. एम रमेश सहा पोलीस अधीक्षक उपविभाग कळंब यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. गोडसे, पोलीस नाईक/1534 सादीक शेख, पोलीस अमंलदार-/1782 नवनाथ खांडेकर, 1812/ किरण अंभोरे,580 शाहरुख पठाण, 1205 श्रीकांत भांगे, 1065/ राठोड, 542/ महागावकर, 553/ विक्रम पतंगे, 467/वडणे, 287/ राऊत असे सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळंब असे सर्वानी सहभाग होऊन केले आहे.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

Post a Comment

0 Comments