Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकसेवकाच्या शासकीय कामात अडथळा करणाऱ्यां एका विरुद्ध गुन्हा दाखल

लोकसेवकाच्या शासकीय कामात अडथळा  करणाऱ्यां एका विरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल 

लोहारा : येथील शंकराव जावळे पाटील महाविद्यालयातील डॉक्टर शेषराव शंकरराव जावळे हे पाटील विद्यालयामध्ये सरकारी काम करीत असताना तालुक्यातील नागोर येथील विनोद दिनकर जावळे पाटील, यांनी त्यांच्याशी हुजत घालून मारहाण केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की विनोद दिनकर जावळे पाटील रा. नागुर, ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांनी दि.12.09.2023 रोजी 12.00 ते 12.30 वा. सु. शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय लोहारा येथे फिर्यादी नामे- डॉ. शेषेराव शंकरराव जावळे, वय 56 वर्षे, व्यवसाय (प्राचार्य) शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय लोहारा ह.मु. उस्मानाबाद हे सरकारी काम करत असताना नमुद आरोपीने सदर ठिकाणी येवून  कॉलेजच्या शेड दुरुस्तीचे काम चालु असताना फिर्यादीयास व कामावर असलेले मजुर यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच शासकिय काम पार पाडण्यास अडथळा निर्माण केला. यावरुन डॉ शेषेराव जावळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 353, 332, 323, 504अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


Post a Comment

0 Comments