सोन पावलांनी गौराईंचे आगमन; घरोघरी वाजत गाजत स्वागत, गौराईंचे आज पूजन उद्या दिला जाणार निरोप, गौराईच्या आगमनाला वरूनराजा ही बरसला
धाराशिव: गुरुवारी सकाळपासूनच महिला गौरीच्या स्वगातासाठी आतुर झाल्या होत्या गौराईचे पारंपारिक पद्धतीने आणि सोन पावलांनी आगमन झाल्यानंतर महिलांच्या उत्साह आला उदान आले. गणरायाच्या आगमनानंतर लक्ष्मी म्हणून मांनल्या जाणाऱ्या गौराईचे गुरुवारी घरोघरी उत्साहात आगमन झाले. सुवासिनीने भक्ती भावाने गौराईचे स्वागत केले. गौराई द सोन पावलांनी एकट्या न येता वरून राजाला घेऊन आल्या. यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. धाराशिव शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी सात वाजेनंतर बहुतांश ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या.
13 सप्टेंबर पासून पावसाची उत्तरा नक्षत्र सुरू असुन वाहन हत्ती आहे, श्री गौरी महालक्ष्मी सोबतच वरून राजाचे दमदार आगमन झाल्याने जिल्ह्यातील बळीराजाला थोडाफार दिलासा मिळाला आहे.
गौराई म्हणजे साक्षात पार्वतीच्या आगमनामुळे घरात सुख-समृद्धी शांतता नांदते असे मानले जाते त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व आहे. गुरुवारी सुहासिनीने कुमारेकीने घरोघरी गौराईचे मुखवटे विधिवत पूजन करून घरी आणण्यात आले. घराच्या प्रवेशद्वारावर गौराई व गौराई समवेत असलेल्या सुवासिनींची पूजन करून स्वागत करण्यात आले. संपूर्ण घरात देवीचे वास्तव व्हावे, यासाठी मी कुठे घरात फिरवून गणरायासमवेत गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजन करून भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी गौराईची पूजन करून समोर विविध खाद्यपदार्थ व फळे मांडण्यात येतात. तसेच त्या रात्री गौरी जागवण्याचा कार्यक्रम होत असतो. यावेळी महिलांकडून गौरीची पारंपारिक गाणे गायली जातात दरम्यान गणपतीनंतर गौराईच्या आगमनाने उत्सवाचा आनंद आणखीन द्वगुणित झाला आहे.
गौरी लक्ष्मीपूजनाचे शुभ मुहूर्त
दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 3.35 मि वाजेपर्यंत भाद्रपद शुक्ल षष्ठीला गौरी लक्ष्मीचे अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरीचे आव्हान करून पूजन केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 22 सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ज्येष्ठा नक्षत्र आहे. त्यामुळे सकाळपासून ते दुपारपर्यंत गौरीला नैवेद्य दाखविला जातो. शनिवारी 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2.56 वाजेपर्यंतच मूळ नक्षत्र असल्यामुळे या काळातच गौरी विसर्जन करता येते. अशी माहिती वेदशास्त्र संपन्न यांनी दिली आहे
0 Comments