धाराशिव : अवैधरित्या गुटखा वाहतुक करणाऱ्यावर नळदुर्ग पोलीसांची कारवाई
धाराशिव : मा. पोलीस. अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली दि.22.10.2023 रोजी नळदुर्ग पो. ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. लोखंडे यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे नळदुर्ग गोलाई चौक ता. तुळजापूर जि. धाराशिव येथे नाकाबंदी नेमुन जाणारे येणारे वाहने चेक करत असताना समोरुन येणारे वाहन क्र टीएस 12 युडी 9273 आयशर टॅम्पो हे वाहन नाकाबंदी दरम्यान चेक केले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. यातील आरोपी नामे-1) शमीम अहमद अब्दुल वाहीद खान, वय 40 वर्षे, रा. प्लॅट नं 110 न्यु हाफीजपेठ मीयापूर हैद्राबाद तेलंगणा, 2) मोहम्मद अमजद कुरेशी रा. फातीमा मस्जिद जवळ नल्लाकुंठा हैद्राबाद तेलंगणा याचे ताब्यात नमुद वाहनात गोवा गुटखा एकुण 45 मोठ्या गोण्या मिळून आल्या. अंदाजे 18,00,000 ₹ किंमतीचा माला सह आयशर वाहन अंदाजे 8,00,000₹ किंमतीचा असा एकुण 26,00,000₹ किंमतीचा माल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेले दोन आरोपी नामे-1) शमीम अहमद अब्दुल वाहीद खान, वय 40 वर्षे, रा. प्लॅट नं 110 न्यु हाफीजपेठ मीयापूर हैद्राबाद तेलंगणा, 2) मोहम्मद अमजद कुरेशी रा. फातीमा मस्जिद जवळ नल्लाकुंठा हैद्राबाद तेलंगणा याचे विरुध्द पोलीस ठाणे नळदुर्ग येथे गुरनं 494/2023 भा.द.वि. सं. कलम 328, 272, 273, 34 सह अन्न व सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलम 26 (2), (आयव्हि), 31(1)(z) 59 (I), (ई), 30(2) (I) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकर करत आहे.
सदर कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बरकते साहेब, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. लोखंडे, पोलीस अमंलदार/924 दराडे, पोलीस अमंलदार 575/शिंदे, एन बी शिदें, 437/ डी.एम. कुंभार यांचे पथकाने केली.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
0 Comments