तुळजाभवानी देवीजींच्या पलंग पालखीचे नगर परिषदेच्या वतीने स्वागत
तुळजापुर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2023 च्या अनुषंगाने आलेल्या पलंग पालखीचा स्वागत तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने सायंकाळी 6-30 वाजता नेपते घरासमोरील 'पालखी ओटा' येथे करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी नगरपरिषद तुळजापूर यांच्या वतीने श्री. वैभव पाठक, कार्यालय अधीक्षक यांनी पलंगाचे स्वागत करून, मानक-यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.यावेळी स्वच्छता निरीक्षक श्री दत्ता साळुंखे, श्री. सुनील पवार,श्री बापूसाहेब रोचकरी, श्री बालाजी जाधव, श्री दत्ता कसबे, श्री कुमार कदम इत्यादी कर्मचारी सदर प्रसंगी उपस्थित होते.
0 Comments