Hot Posts

6/recent/ticker-posts

सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मुख्यमंत्र्याचे कृषी मदत व पुनर्वसनला निर्देश

सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मुख्यमंत्र्याचे कृषी मदत व पुनर्वसनला  निर्देश

मुंबई : राज्यातील नऊ जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकावर पडलेल्या बुरशीजन्य आणि विषमजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बळीराजाला दिलासा देण्यासाठी तातडीने पिकाचे पंचनामे करावे अशी निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत.

यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबर मध्ये झालेला पाऊस तापमानातील बदल तसेच इतर काही कारणामुळे सोयाबीन पिकावर पिवळा येलो मोजक या विषाणूजन्य आणि खोडखूज मुळकुज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषता चंद्रपूर नागपूर गडचिरोली यवतमाळ सोलापूर लातूर वाशिम नांदेड या जिल्ह्यात हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनची पीक पिवळे पडत चालली आहे. कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागाने संयुक्तपणे तातडीने या सोयाबीन नुकसानीचे पंचनामे सुरू करावे असे निर्देश शिंदे यांनी दिले आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षण क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावी म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत अशी सूचनाही त्यांनी दिले आहेत

Post a Comment

0 Comments