Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील खंडाळा येथे क्षयरोग मुक्ती अभियान संपन्न,

तुळजापुर तालुक्यातील खंडाळा येथे क्षयरोग मुक्ती अभियान संपन्न 


तुळजापुर: आयुष्यमान भव मोहिम व सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहीम संदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरा अंतर्गत  आरोग्यवर्धिनी केंद्र  काक्रंबा, बारूळ अंतर्गत खंडाळा या गावात माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी यांनी भेट दिली. यावेळी आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत करण्यात येणाऱ्या तपासण्या, औषधोपचार ऑनलाईन इंट्रीज,ऑनलाईन रिपोर्टिंग वेळेत भरणे  तपासण्या करणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरा दि मधील आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांनी स्वतः निक्षे मित्र होऊन सहा रुग्ण सहा महिन्यासाठी दत्तक घेतले. यामध्ये आरोग्य सहाय्यक श्री सतीश कोळगे यांनी 2 क्षय रुग्ण, श्रीमती राजश्री भिसे व मेघा जाधव यांनी प्रत्येकी एक, आरोग्य सेवक श्री सौदागर गायकवाड यांनी 1 ,व प्रा आ केंद्रातील सर्व आशा यांच्यातर्फे 1 क्षय रुग्ण असे एकूण 6 क्षय रुग्ण दत्तक घेतले. यावेळी माननीय डॉ.अन्सारी सर जिल्हा क्षयरोग अधिकारी व तालुकास्तरीय पर्यवेक्षक श्री महेश पाठक यांच्या हस्ते सदरील निक्षय मित्रांचा सत्कार करण्यात आला, यावेळी जिल्हा अधिकारी क्षयरोग अधिकारी डाॅ. अन्सारी यांनी गावकऱ्याशी संवाद साधून क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी आव्हान केले.

यावेळी डॉक्टर भिसे डॉक्टर मेघा जाधव,श्री अडसूळ ,श्री सौदागर गायकवाड, श्रीमती भोसले ,आरोग्य सेविका श्रीमती सारिका पवार ,श्रीमती स्वामी छाया व खंडाळा येथील आशा कार्यकर्ती उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर 

Post a Comment

0 Comments