राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ जिल्हा शाखा धाराशिवचे आढावा बैठक संपन्न
धाराशिव : राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्य सरचिटणीस अनिल नाचपले सर यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्हा शाखेची सभा शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे संपन्न झाली.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भर कर्मचारी अधिकारी शाखेच्या आढावा सभा व कर्मचारी अधिकारी जोडो अभियान सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आजची धाराशिव ची सभा होत असल्याचे राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर यांनी स्पष्ट केले.. या सभेमध्ये 19 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या राज्य अधिवेशना संदर्भात चर्चा करून नियोजन करण्यात आले काही नवीन जिल्हा तथा तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करून संघटना विस्तार करण्यात आला... सद्यस्थितीतील ओबीसी कर्मचारी अधिकाऱ्यांचे प्रश्न व संविधानिक मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी येणाऱ्या 19 नोव्हेंबर 2023 रोजी सर्व कर्मचारी अधिकारी वर्गांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.
या सभेसाठी राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, राज्य समन्वयक विजयकुमार पिनाटे, लातूर जिल्हा महिला अध्यक्ष रेखा सुडे, धाराशिव जिल्हा अध्यक्ष संतोष भोजने, मराठवाडा विभागीय अध्यक्ष लक्ष्मण दावणकर याच्या सह जिल्ह्यातील असंख्य कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.. जिल्ह्यातुन जास्तीत जास्त कर्मचारी अधिवेशनास उपस्थित राहतील असे आश्वासन जिल्हाध्यक्ष संतोष भोजने यांनी दिले..ओबीसी च्या विविध प्रश्नांवर पदाधिकारी यांनी आपले मते मांडले व ओबीसी एकतेचा नारा मजबूत करणेचा निर्धार केला.. त्याचबरोबर तालुका जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments