Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : सरसकट लिंगायताना आरक्षण मागणीसाठी लिंगायत महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धाराशिव : सरसकट लिंगायताना आरक्षण मागणीसाठी लिंगायत महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 


धाराशिव: लिंगायत महासंघाच्या वतीने पर्यंत अध्यक्ष प्रा. सुदर्शन बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली सरसकट लिंगायत यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठीचे निवेदने राज्यभरातून मुख्यमंत्र्यांना देण्यात येत आहे. यावेळी धाराशिव जिल्हाधिकारी यांना लिंगायत महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
 या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात एक कोटी लोकसंख्या असलेला लिंगायत समाज 2014 साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि ओबीसीचे आरक्षण जाहीर केले , महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला लिंगायत हिंदू लिंगायत  वाणी नावाने ओळखले जाते ,मात्र 2014 साली वाणी लिंगायत वाणी या नावाला आरक्षण दिले गेले त्याचा फायदा समाजातील खूपच अल्प लोकांना झाला, मात्र लाखोंच्या संख्येने जातीची नोंद लिंगायत ,हिंदू लिंगायत  असल्यामुळे वाणी समाजाला  आरक्षणाचा कसलाच फायदा झाला नाही ,महसुली पुरावे शोधून आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला परंतु 
पुरावे न मिळाल्यामुळे समाजाला पूर्ण आरक्षण मिळू शकले नाही ,त्यानंतर आमची मागणी  पुढच्या सरकारकडे चालू राहिली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबई बैठका झाल्या त्यांना सर्व कागदपत्रे सादर केले होते, मात्र पाच वर्ष होत आहेत आम्हाला अध्याप न्याय मिळाला नाही 
तरी मेहरबान महोदयांनी विनंती आहे की वाणी नावाला जी ओबीसीच्या आरक्षण लागू झाले आहे ते लिंगायत हिंदू लिंगायत या नावाने नोंद असणाऱ्या सरसकट लिंग आहेत, त्यांना लागू होण्यासाठी शासनाने शुद्धिपत्र काढावे ज्यात वाणी लिंगायत, हिंदू लिंगायत ,ही एकाच जातीची नावे आहेत, असा उल्लेख असावा तरी मेहरबान साहेबांनी या निवेदनाद्वारे न्याय देण्यासाठी विनंती करण्यात येत आहे . या निवेदनावर प्राध्यापक सुदर्शन बिराजदार प्रांत अध्यक्ष लिंगायत महासंघ अडवोकेट अजय वाघाळे किसन कोलते ,विवेकानंद मुळे, सिदेश्र्वर बेलूरे, पाटील, बिराजदार आदींच्या स्वाक्षरी आहेत.


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

Post a Comment

0 Comments