Hot Posts

6/recent/ticker-posts

अत्याचार प्रकरणी आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास, अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल|10 years rigorous imprisonment for the accused in the torture case, Akola District and Sessions Court verdict

अत्याचार प्रकरणी आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास, अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

अकोला: अल्पवयीन मुलीस फोर्स लावून पळवणे आणि तिच्यावर अत्याचार करणे प्रकरणी आरोपी गणेश गजानन अंजनकर वय 32 वर्षे याला दहा वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अकोल्याचे अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस .जे शर्मा यांच्या न्यायालयाने हा निकाल शनिवारी दिला आहे.

अकोला येथील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाणे अंतर्गत अकोला अंतर्गत आरोपी गणेश गजानन अंजनकर वय 32 वर्षे राहणार कृषी नगर यांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेऊन सैलानी येथे एक महिना ठेवले. वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने ती गरोदर राहिली. पोलीस तपासात आरोपीसह पीडित सैलानी येथे मिळून आल्यावर आरोपीस अटक करण्यात आली.दि,17.7.2015 रोजी पीडितेच्या वडिलांनी बेपत्ता प्रकरणी पोलीस स्टेशनला फिर्या दिली होती चौकशी दरम्यान पीडीतेच्या घेतलेल्या बायानुसार सदर गुन्हा बाबत हकीकत समोर आली. आणि आरोपीवर सदर खटला चालण्यात आला. या प्रकरणात सरकारतर्फे एकूण नऊ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.

 सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील किरण खोत यांनी बाजू मांडली. प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस अधिकारी संजय राम हित मिश्रा यांनी केला त्यांना श्रीकांत गावंडे, प्रिया गजानन शेंगोकार यांनी सहकार्य केले. साक्ष पुरावा ग्रहाचे धोरण आरोपीस दहा वर्षाचा सश्रम कारावास  ठोठावण्यात आला आहे. कलम 376 (२)आय पोस्को कायदा कलम 4, 6 मध्ये दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास, कलम 363 मध्ये सात वर्षे सक्त मजुरी शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षे साधा कारावास. एकूण दंड रुपये 10000 सर्व शिक्षा आरोपीस एकत्रित भोगावयाच्या आहेत.

या प्रकरणात खटला अंतिम टप्प्यात असताना आरोपी न्यायालयात सतत गैरहजर होता त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले या प्रकरणातील अन्य एक आरोपी दीपक ओंकार न्रप नारायण याला सबळ पुराव्या अभावी मुख्य आरोपीस मदत करण्याचे आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments