अन्न व औषध प्रशासनातर्फे तुळजापूर शहरात व मंदिर परिसरात कारवाई

Hot Posts

6/recent/ticker-posts

अन्न व औषध प्रशासनातर्फे तुळजापूर शहरात व मंदिर परिसरात कारवाई

अन्न व औषध प्रशासनातर्फे तुळजापूर शहरात व मंदिर परिसरात कारवाई
प्रतीकात्मक फोटो


धाराशिव दि. १८ :- श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त  तुळजापूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने आज १८ ऑक्टोबर  रोजी  शहरातील एकूण १४ अन्न आस्थापना हॉटेल, स्विट मार्ट, नमकीन / फराळ उत्पादक व विक्रेते, खवा व पेढा विक्रेते, यांच्या तपासण्या करण्यात आलेले आहे. विना परवाना व्यवसाय करणाऱ्या एकूण ०२ अन्न व्यवसायिकाना नोटीस देवून परवाना घेईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

तसेच येरमाळा येथील येडेश्वरी देवी मंदिर परिसरातील एकूण ३३ अन्न आस्थापना हॉटेल, स्विट मार्ट, नमकीन , फराळ उत्पादक व विक्रेते, खवा व पेढा विक्रेते, यांच्या तपासण्या करण्यात आलेले आहे. विना परवाना व्यवसाय करणाऱ्या एकूण १३ अन्न व्यवसायिकाना नोटीस देवून परवाना घेईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, तसेच ०९ ठिकाणी टिपीसी मीटरद्वारे खाद्यतेलाचे नमुने तपासले असता त्याचा रिडिंग २५ पेक्षा कमी आलेली आहे. तसेच आजरोजी पेढा या अन्न पदार्थाचे ८ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. ही कार्रवाई अन्न सुरक्षा अधिकारी सु.जि. मंडलिक यांनी केलेली आहे

भाविक भक्तांनी अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत तक्रार असल्यास या कार्यालयास माहिती देवून सहकार्य करावे जेणे करून संबंधिताविरुद्ध त्वरित कार्यवाही घेणे शक्य होईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त  शि. बा. कोडगिरे यांनी केले आहे.

प्रतिनिधी रूपेश डोलारे धाराशिव 

Post a Comment

0 Comments