Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेकरिता सोनाली शिंदे रवाना

राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेकरिता सोनाली शिंदे रवाना

धाराशिव : कळंब येथील सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. सोनाली दशरथ शिंदे ही नुकतीच चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्य स्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता रवाना झाली.

यापुर्वी तिने कळंब तालुका स्तरीय ,धाराशिव जिल्हा स्तरीय व लातुर विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत 100 मीटर हर्डल्स या प्रकारात प्राविण्य मिळवले व चंद्रपुर येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेत ती लातूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

 स्पर्धेला जाताना विजयी होण्यासाठी तिला सा. फुले विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री जयचंद कुपकर, उपमुख्याध्यापक श्री जाफर पठाण, उपप्राचार्या डॉ.श्रीमती मिनाक्षीताई शिंदे , क्रीडा विभाग प्रमुख श्री उत्रेश्वर गायकवाड, समर्थ प्राथमीक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलभाताई शिंदे यांनी तिला पुष्पहार व बुके देऊन शुभेच्छा दिल्या.

तिला विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख श्री उत्रेश्वर गायकवाड, उपप्राचार्या डॉ.श्रीमती मिनाक्षीताई शिंदे मॅडम व माजी तालुका क्रीडा समन्वयक श्री लक्ष्मण तात्या मोहिते यांचे मार्ग दर्शन लाभले. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments