Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील मसला खुर्द येथे मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी

तुळजापुर तालुक्यातील मसला खुर्द येथे मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी

तुळजापुर  : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाचे नवीन पर्व सुरू झाले आहे . मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या मुदतीत आरक्षणाचा निर्णय झालेला नाही, बुधवारी आंदोलनाची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र रविवारी जरांगे पाटील यांनी केलेल्या सुतवाचनुसार धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पुढारी गाव बंदीचा निर्णय होत आहे.तुळजापुर तालुक्यातील मसला खुर्द येथील सकल मराठाच्यावतीने  मा.श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षाचे खासदार, आमदार तसेच सर्व राजकीय नेते यांना मसला खुर्द गावात गाव प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

चुलीत गेले नेते आणि चुलत गेले पक्ष ,मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष -राजकीय पुढाऱ्यांनी आपली मान, मर्यादा राखून गावात प्रवेश करावा.,'जो समाजाला मानत नाही.. त्याला समाज मानणार नाही" या आशयाचे स्टेटस ठेवत मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष व पुढाऱ्यास गावात प्रवेश नाही असा निर्धार तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.







Post a Comment

0 Comments