तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी देवीजींच्या नवरात्र महोत्सवास अर्चना पाटील यांची भेट
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी देवीजींच्या नवरात्र महोत्सवास जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी भेट देऊन महालक्ष्मी मातेची ओहटी भरून देवीची आरती करण्यात आली. यावेळी सौ पाटील यांनी ग्रामस्थ सोबत बैठक घेऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी बोलताना सौ.पाटील यांनी प्रामुख्याने जल जीवन मिशन अंतर्गत तब्बल रुपये १९ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचा समावेश होता. सदरील योजनेचे ३०% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम होताच संपूर्ण गावकर्यांना नळाद्वारे पाणी मिळणार आहे. सदर योजनेमुळे महिलांना होणारा पाण्याचा त्रास थांबणार आहे, असे म्हंटल्या.
तीर्थक्षेत्र विकास निधीतून भरपूर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महादेव मंदिर समोरील सभा मंडपात देखील वाढीव निधी, महालक्ष्मी मंदिर परिसरात पाण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे , तसेच पालखी मार्गासाठी ही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे , राज्य मार्ग ते गावास जोडणारा रस्ता देखील प्रास्ताविक आहे . आदि विषयावर सौ. पाटील यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.यावेळी बैठकीस सरपंच शिवकन्या प्रशांत बिराजदार, प्रभाकर बिराजदार , उपसरपंच लक्ष्मण लबडे,भीमा देडे, राजेंद्र शिंदे, मोहन काळजाते, ग्रामपंचायत सदस्य, पुजारी मंडळ ,ट्रस्ट मंडळ, महिला , गावातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
0 Comments