Hot Posts

6/recent/ticker-posts

गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरास एक वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड

 गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरास एक वर्ष कारावास व  दहा हजार रुपये दंड


       धाराशिव.दि.20:-गर्भधारणा पूर्व व  प्रसूतीपूर्व  गर्भलिंग निवडीस प्रतिबंधक कायदा अंमलात असूनही काही ठिकाणी कायद्याचे  उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सल्लागार समिती व पीसीपीएनडीटी दक्षता समिती सतत तत्पर असून  कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कारवाई केली जाते. अशीच कारवाई 2014 मध्ये करण्यात आली होती. विभागीय दक्षता पथकामार्फत धाराशिव, जिल्ह्यात धडक मोहीम अंतर्गत तपासणी करण्यात आली, तपासणीमध्ये दोषी विरुद्ध कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये धाराशिव येथील एका डॉक्टरानी पी.सी.पी.एन.डी.टी. कायद्याचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या अधिकार पत्रानुसार प्रकरण दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी डॉक्टर यांना मुख्य न्याय दंडाधिकारी एम. एस.भदाणे यांनी   एक वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता  व्ही.एस  शेवाळकर यांनी कामकाज पाहिले तर त्यांना पीसीपीएनडीटी विधी सल्लागार एडवोकेट रेणुका शेटे यांचे सहकार्य लाभले. 

     अवैद्यरित्या गर्भलिंग निदान तसेच अवैधरित्या गर्भपात करणाऱ्यांची माहिती द्या व एक लाख रुपये मिळवा

          धाराशिव जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे हि अत्यंत गंभीर बाब आहे. अवैधरित्या गर्भलिंग निदान करणाऱ्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीस राज्य शासनाकडून खबरी योजनेअंतर्गत एक लाख रुपये बक्षीस देण्यात येते.माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. ही माहिती कळवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक 18002334475 या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा नजदीकच्या ग्रामीण, उपजिल्ह,जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय धाराशिव येथे संपर्क साधावा. नागरिकांनी माहिती देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments