कळंब तालुक्यातील गौरगाव येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू
कळंब दि.३०(प्रतिनिधी)कळंब तालुक्यातील गौरगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे काही दिवसांपूर्वी अमरण उपोषणाला बसले होते. शासनाला ४० दिवसांची मुदत देण्यात आली होती.मुदत संपुणही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. यांच्या उपोषणास कळंब तालुक्यातील गौरगाव येथे साखळी उपोषणाच्या माध्यमातून पाठिंबा देत आज दि.३०ऑक्टोंबर पासुन साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हे साखळी उपोषण सुरू रहाणार असुन आज साखळी उपोषणाचा १ ला दिवस आहे. सदरील उपोषण गौरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये सुरू करण्यात आले आहे.आजच्या साखळी उपोषणात श्री.आगतराव कापसे पाटील, हनुमंत माने,किशोर पाटोळे,लहु कापसे,दौलत पवार,पवन नेताजी कापसे हे साखळी उपोषणात बसलेले आहेत. जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत गौरगाव ता कळंब येथे साखळी उपोषण सुरू रहाणार असे उपोषण कर्ते श्री.आगतराव कापसे पाटील यांनी सांगितले आहे.
0 Comments