धाराशिव तालुक्यातील वरवंटी, वडगाव सिद्धेश्वर, कामठा, आपशिंगा परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन,बिबट्याकडून एका गाईच्या वासरावर हल्ला
धाराशिव: धाराशिव तालुक्यातील वरवंटी, कामठा अपसिंगा वडगाव सिद्धेश्वर या शिवार परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, शनिवारी एका शेतकऱ्याच्या गाईच्या वासराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैद झाल्याने परिसरातील कामठा ,आपशिंगा, सिद्धेश्वर वडगाव परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या वन विभागाकडून सूचना देण्यात आले आहेत.
0 Comments