शारदीय नवरात्र महोत्सवात आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती|tuljabhavani shardiy navratra mahoshv

Hot Posts

6/recent/ticker-posts

शारदीय नवरात्र महोत्सवात आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती|tuljabhavani shardiy navratra mahoshv

शारदीय नवरात्र महोत्सवात आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती

 तुळजापूर शहरात २१ ठिकाणी , तर ग्रामीण भागात १९ ठिकाणी प्रथमोचार केंद्र      


धाराशिव दि.03:--धाराशिव जिल्ह्यात श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीची शारदीय नवरात्र महोत्सव यात्रा दि .06 ते 30 ऑक्टोंबर  2023 या कालावधीत मोठया प्रमाणात यात्रा भरणार आहे. यात्रेमध्ये येणाऱ्या यात्रेकरुंना आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांचेमार्फत उपचारात्मक व प्रतिबंधात्मक सेवा देण्यात येत आहे. यात्रा कालावधीत तात्काळ आरोग्य सेवा देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे अधिकारी, कर्मचारी, व रुग्णवाहिका संदर्भीय आरोग्य सेवा देण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत तुळजापूर शहरात एकुण 21 ठिकाणी प्रथमोपचार केंद्र ठेवण्यात आलेली आहेत. तसेच तीन 108 रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आलेल्या असून या प्रथोमोपचार केंद्रात पुरेश्या प्रमाणात औषधीसाठा उपलब्ध केलेला आहे. तरी प्रथमोपचार केंद्रात यात्रेकरूना आरोग्यसेवा देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात 19 ठिकाणी प्रथम उपचार केंद्र

तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सव कालावधीत श्री क्षेत्र तुळजापूर येथे पायी येणाऱ्या यात्रेकरुंसाठी ग्रामीण भागात 19 ठिकाणी प्रथोमचार केंद्र चालु करण्यात आलेली आहेत. यात्रा मार्गावर वडगाव, पाटोदा मोड, आष्टामोड, माकणी, तामलवाडी, कसई, माळूम्ब्रा, बोरी, तीर्थ (बु),देवसिंगा, ताकविकी, कांक्रंबा, तुरोरी, येणेगुर, तलमोड,नळदुर्ग,जळकोट,लोहारा, नारंगवाडी या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरू केलेले आहे.

शहरात उपाययोजनेसाठी 10 आरोग्य पथके तयार केलेली असून या पथकास गल्ली, वार्डाचे वाटप करून या भागातील सर्व पाणी साठ्याचे हॉटेल, धाबे, खाणावळ येथील पाण्याचे निर्जंतुकीकरण करून पाणी शुद्धीकरण झाल्याची खात्री ओ.टी.टेस्ट घेऊन करण्यात येते. ओ.टी. टेस्ट निगेटीव्ह आल्यास मदर सोल्युशन किंवा मेडीक्लोर द्वारे पाणी साठ्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येते.

 तरी यात्रेकरूनी या आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन  राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव, डॉ. एस. एल. हरिदास, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव व डॉ.इस्माईल मुल्ला, जिल्हा शल्यचिकीत्सक, धाराशिव यांचे मार्फत करणात आलेले आहे.                             

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

Post a Comment

0 Comments