धाराशिव जि.प.सरळसेवा पदभरती-2019 रद्द परीक्षा शुल्क परत मिळण्यासाठी उमेदवारांनी तात्काळ ऑनलाईन माहिती सादर करण्याचे आवाहन
धाराशिव,दि.29: सन 2019 मधील जिल्हा परिषद धाराशिवच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी 11 संवर्गाची क्रं.1/2019, दि.3 मार्च 2019 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. तथापि, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2022/प्र.क्र.11/आस्था-8,दि.21 ऑक्टोबर 2022 नुसार सरळसेवा पदभरती 2019 रद्द करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.
या परीक्षेकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने http://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक 5 सप्टेंबर 2023 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्यामध्ये उमेदवारांनी त्यांची वैयक्तीक आवश्यक माहिती भरल्यानंतर त्याची तपासणी करुन संबंधित उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे. यासंदर्भात 3 हजार 939 उमेदवारांनी त्यांची माहिती या दिलेल्या लिंकवर भरलेली आहे. त्यापैकी डेटा व्हेरीफाईड झालेल्या 3 हजार 9 उमेदवारांना त्यांच्या खात्यावर परीक्षा शुल्क जमा करण्यात येत आहे.
तरी जिल्हा परिषद धाराशिव येथे सरळसेवा पदभरती 2019 च्या अनुषंगाने जाहिरातीनुसार अर्ज सादर केलेल्या व http://maharddzp.com वरील लिंकवर माहिती न भरलेल्या उर्वरित उमेदवारांनी पैसे परत मिळण्यासाठी उपरोक्त लिंकवर त्यांची माहिती तात्काळ भरावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) सुर्यकांत भुजबळ यांनी केले आहे.
0 Comments