Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील चिवरी परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकांसह द्राक्ष बागांना फटका

तुळजापुर तालुक्यातील चिवरी परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकांसह द्राक्ष बागांना फटका

चिवरी : तुळजापुर तालुक्यातील चिवरी, येवती,आरळी,काळेगाव,चिंचोली, काटगाव,खानापुर, परिसराला मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडासह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपुन काढले आहे. या पावसामुळे ज्वारी, हरभरा ,गहू, कांदा पिकास  मोठा फटका बसला आहे, यासह द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची वादळी वाऱ्याच्या पावसामुळे ज्वारी, ऊस,मका पिके जमीनदोस्त झाली आहेत, परिसरात यंदा सुरुवातीपासूनच म्हणावा तसा पाऊस पडला नाही, ओढे, साठवण तलाव, विहिरी, कुपनलिका कोरडेठाक आहेत. यामुळे खरीप पिक अधून मधून पडत गेलेल्या पावसावर जोपासले गेले, सिंचनाची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी शेतातील खरिपाची सोयाबीन उडीद मूग आदी पिके काढून रब्बी पेरणी केली तर पाण्याची व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत करून घेतली, पेरणी करण्यासाठी पुरेसा पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते, मंगळवारी दि,२८ रोजी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील गावात पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे, तर या पावसामुळे पेरणी न झालेले शेतकरी पेरणी करता येणार यामुळे आनंदी झाला आहे. एकंदरीत या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.





Post a Comment

0 Comments