धाराशिव जिल्हायातील शेतकऱ्यांनी रब्बी पिके विमा संरक्षित करावीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन
धाराशिव : जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी हरभरा गहू या पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे, नैसर्गिक आपत्ती कीड व रोगामुळे होणाऱ्या नुकसानी पासून पिके संरक्षित करण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांनी आपली पिके विमा संरक्षित करून घ्यावीत असे आवाहन आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी केले आहे. रब्बी ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर तर गहू हरभरा कांदा या पिकासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर आहे. जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिक विमा भरल्याने त्यांना मदत झाली आहे. रब्बी हंगामात पाणी पातळीत दिवसेंदिवस होत असलेली घट हवामान बदल कीड व रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव यासह नैसर्गिक आपत्तीने रब्बी पिकाच्या उत्पादनात घट आल्यास शेतकरी मोठ्या संकटात येतो. महायुती सरकारने केवळ एक रुपयात पिकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे. बालाघाट न्यूज टाइम्स तुळजापूर धाराशिव
0 Comments