Hot Posts

6/recent/ticker-posts

गरिबांच्या घरात दिवाळी हा वात्सल्यचा कौतुकास्पद उपक्रम - महंत इच्छागिरी महाराज

गरिबांच्या घरात दिवाळी हा वात्सल्यचा कौतुकास्पद उपक्रम - महंत इच्छागिरी महाराज 


तुळजापुर:-हर्षोल्हास,मांगल्य, दीपोत्सव आणि समृद्धी घेऊन येणारी दिवाळी थोरामोठ्यांच्या कुटुंबासाठी नवीन नाही पण गावोगावी भटकंती करणाऱ्या आणि एकल महिलांच्या घरी जाऊन दिवाळीचे सर्व साहित्य देणे हा वात्सल्य सामाजिक संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मत आई तुळजाभवानी देवीजींच्या गरीबनाथ मठाचे मुख्य महंत इच्छागिरी महाराज यांनी व्यक्त केले.

वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून तुळजापूर आणि परिसरातील एकल, विधवा,अनाथ,गरीब भगिनी व त्यांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम चालते औसा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायीक श्री.धनराज परसणे यांनी संस्थेच्या माध्यमातून काम चालणाऱ्या लाभार्थ्यांना दिवाळी गोड करण्यासाठी फराळासाठी लागणारा सर्व प्रकारचा किराणा,साडी व अन्य साहित्य दिले  त्यामुळे ह्या भगिनींच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले.

यावेळी धाराशिव येथील कौटुंबिक न्यायालयाचे श्री.सचिन मोरे,राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे तथा वात्सल्यचे मार्गदर्शक श्री.उमाकांत मिटकर,डॉ.अनिकेत स्वामी भाजपचे पदाधिकारी श्री.विनोद जाधव एसबीआयचे अधिकारी श्री. बाळासाहेब हंगरगेकर युवा नेते श्री.प्रवीण भोसले,दलित पॅंथरचे श्री,अनिल पवार श्री.कृष्णा हंगरगेकर,श्री.नितिन सरवदे यांची उपस्थिती होती.


“आनंद वाटला”

दुष्काळी स्थितीमुळे सगळीकडेच परिणाम झालाय.यावेळी दिवाळीचा आनंद मिळणार नाही असे वाटले होते. पण वात्सल्यने केलेल्या मदतीमुळे आम्हालाही दिवाळीचा आनंद मिळाला         

                 सोनाबाई शिंदे

                    लाभार्थी

Post a Comment

0 Comments