Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची सातलिंग स्वामी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची सातलिंग स्वामी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धाराशिव: संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळात दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी सवलती जिल्ह्यातील नागरिकांना द्याव्यात अशी मागणी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक  संघटनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस सातलिंग स्वामी यांनी मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी दाखल केलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत स्वामी यांनी निवेदनात केलेल्या मागणीनुसार सन 2023-2024 या शिजनमधील जून ते सप्टेंबर या पावसाळा कालावधीमध्ये अवेळी व अत्यंत तुरळक पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी जुलैच्या शेवटच्या टप्प्यात तेही पाऊस पडेल या भाबड्या आशेने रामभरोसे खरिपाची पेरणी केली होती. मात्र सबंध पावसाळा सरला तरीही अत्यंत तुरळक व अवेळी जेमतेम शिडकावा झाल्याने खरीप पूर्णतः हातचे गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांकडून व खाजगी सावकारांकडून पीक कर्ज काढून कशीबशी लागवड सारली होती. मात्र शेवटी कसलेच पीक हाती आले नसल्याने शेतकरी कोलमडून पडला आहे. उभ्या शेतात नांगर मारून रब्बीची तयारी जरी केली असली तरी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सप्ताहापर्यंतही पावसाने दडीच मारली आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी ही बेभरवशावर केली जात आहे. पाऊस येण्याची शक्यता नसल्याने पावसाअभावी तलाव धरण्यातील पाण्याने तळ गाठला असल्याने थोडे बहुत शिल्लक असलेले पाणी भविष्यात नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी राखून ठेवले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तलाव व धरणाशेजारील वीजपुरवठा ऑगस्ट महिन्यातच बंद केला असल्याने खरीप पिकासाठी पाणी देता आले नाही. त्यातच आता कशीबशी पेरणी करत असलेल्या रब्बी पिकासही देता येत नाही. त्यामुळे सदर वर्षातील पीक कर्जासह वीज बिलेही माफ करावीत अशी विनंती करतो. मा. मुख्यमंत्री साहेबांनी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या सोयी-सवलती पुरवाव्यात व खालील प्रमाणे मागण्यांचीही पूर्तता करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. 

1) शेतकऱ्यांचे पीक कर्जासह वार्षिक वीज बिलही माफ करावे. 

2) 2023-24 च्या रब्बी हंगामासाठी लागणारी बियाणे  व खते मोफत द्यावीत. 

3) रोजगार हमीची कामे जास्तीत जास्त तर काढावीच शिवाय त्यावरील मजुरांना दर दिवशी पाचशे रुपये मजुरी द्यावी. 

4) नागरिकांना दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिधांमधील वस्तूंची वाढ करून त्यामधील वस्तू उदा.  साखर-10 किलो, तेल- 10 किलो, चणाडाळ- 05 किलो, रवा-05 किलो, तूर डाळ-10 किलो, मूग डाळ-10 किलो, तांदूळ-50 किलो, गहू-50 किलो सरसकट प्रतीकुटुंब द्यावे.

उपरोक्त बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून उपरोक्त मागण्यांची पूर्तता करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत अशी विनंती सदर निवेदनात केली आहे.

Post a Comment

0 Comments