मराठा संघर्ष योध्दा जरांगे पाटील यांच्या कुटुंबीयांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन
तुळजापुर प्रतिनिधि: मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा समाजाला सरसकट ५० टक्के च्या आत न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारं आरक्षण तात्काळ देण्यात यावे.करीता जीवाचे राण करत असलेल्या जरांगे पाटील यांना बळ मिळावे.म्हणून तुळजापूर शहर सकल मराठा समाजाच्या वतीने (दि.३) रोजी तुळजापूर येथे मोठ्या स्वरुपात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यासाठी जरांगे पाटील यांच्या पत्नी, मुलगी व बहिण ह्या तुळजापूरात आल्या होत्या. त्यानिमित्ताने त्यांनी श्रीतुळजाभवानीचे दर्शन घेतलेयावेळी जरांगे पाटील यांच्या पत्नीने श्री तुळजाभवानी मातेकडे माझे कुंकु शाबूत ठेव व मराठ्यांना न्याय दे असे साकडे घातले. त्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बहुसंख्येने मराठा बांधव तसेच महिला व इतर समाजातील पक्ष पदाधिकारी, वकील बांधव ,सामाजिक संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर
0 Comments