Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रत्येक भारतीयावर लोकशाही,संविधान टिकविण्याचे दायित्व!!! ॲड.उल्हास बापट

प्रत्येक भारतीयावर लोकशाही,संविधान टिकविण्याचे दायित्व!!! ॲड.उल्हास बापट

घटना बदलली तरीदेखील भारताचे हिंदू राज्य कधीही होऊ शकत नाही - ॲड. उल्हास बापट


पुणे -धर्म मानून प्रत्येकाला समान संधी, (Pune)अधिकार व सन्मान देणारे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले. याच संविधानावर आधारलेली भारतीय लोकशाही जगात आदर्शवत आहे. परंतु, अलीकडच्या काही दिवसांत लोकशाही, संविधानाची मूल्ये पायदळी तुडवत त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु, धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा पाया असून, संविधानाच्या मूळ रचनेला हात घालता येत नाही.

संविधान व लोकशाहीवर होणारे हे आघात परतवून लावण्याचे आणि ते टिकवण्याचे दायित्व प्रत्येक भारतीयांवर आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ घटनातज्ज्ञ व विधिज्ञ ॲड. उल्हास बापट यांनी केले.पुढे बापट म्हणाले की घटना बदलली तरीदेखील हिंदू राज्य बनू शकत नाही कारण बेसिक घटना बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही, त्यामुळे जनतेची दिशाभूल देखील कोणी करू नये. 

संविधान सन्मान समिती, सम्यक ट्रस्ट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)(Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने अमृतमहोत्सवी संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन व ‘भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सव’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते.  ‘रिपाइं’चे राज्य सचिव बाळासाहेब जानराव अध्यक्षस्थानी होते.

ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक प्रा. डॉ. प्रकाश पवार, शहराध्यक्ष संजय सोनावणे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते अंकल सोनवणे, ॲड. मंदार जोशी, ॲड. अर्चिता जोशी, बाबुराव घाडगे,  शाम सदाफुले, निलेश आल्हाट, निलेश रोकडे, जयदीप रंधवे आदी उपस्थित होते. उल्लेखनीय यश मिळवलेल्या उज्ज्वला जयदेव रंधवे, चंद्रिका पुजारी, श्रावणी रोकडे, ऋतिका धिवार या विद्यार्थ्यांचा गौरव, तसेच नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या व अपेक्षित प्रश्नसंच वितरण यावेळी करण्यात आले.

Post a Comment

0 Comments