तुळजापुर तालुक्यामध्ये पाण्याअभावी तुर पिक धोक्यात, तुरीचे उत्पादन घटनार, निसर्गाच्या लहरीपणाला शेतकरी वैतागले
तुळजापुर : तालुक्यात यंदा अल्पसा पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पिकाबरोबर आता पाण्याअभावी तुर पिक ही धोक्यात आले आहे. अल्पशा पावसावर तुरीचे पीक शेत शिवारात कसेबसे बहरले आहे, सध्या तुरीला फुलांचा बहर चालू असून पावसाची गरज आहे, पाऊस नसल्यामुळे फुल गळती होत आहे, सोयाबीन पाठोपाठ आता तुरीची पीक ही धोक्यात आले असून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी वैतागल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यात खरिपाच्या पेरण्या जेमतेम पावसावर झाले आहेत, नंतर पावसाच्या प्रतीक्षेत सोयाबीन सह ,मूग, उडीद पिके हातची गेली. अधून मधून पडलेल्या पावसामुळे तुरीच्या पिकाला थोडासा दिलासा मिळाला सध्या तूर फुलांनी भरून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत ् झाल्या आहेत. मात्र सध्या तुर पिकाला पावसाची गरज आहे, मात्र शेतकऱ्यांकडे पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे पिकांना पाणी देणेही अशक्य झाले आहे, त्यामुळे तुर पिकाची सध्या पाणी अभावी फुल गळती होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. एकंदरीत तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाचा सामना सतत करावा लागत आहे, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत असून शासनही शेतकऱ्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष करत असल्याने सध्या तरी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बालाघाट न्यूज टाइम्स तुळजापुर धाराशिव
0 Comments