धाराशिव : जागतिक एड्स दिनानिमित्त १ डिसेंबर रोजी जनजागृती रॅली
धाराशिव,दि.30: जागतिक एड्स दिन म्हणून 1 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता जनजागृती रॅलीचे आयोजन जिल्हा रुग्णालय येथे करण्यात आले आहे.
या रॅलीमध्ये अकरावी, बारावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. रॅलीचा मार्ग जिल्हा रुग्णालय - मारवाडी गल्ली - नेहरु चौक - जूना पूल - ताज महाल टॉकीज - शिवाजी महाराज चौक - डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हा रुग्णालय असा आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा एड्स नियंत्रण समितीचे सचिव डॉ.नागनाथ धर्माधिकारी यांनी केले आहे.
0 Comments