Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथे १३ डिसेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन -Akhand Harinam week organized from 13th December at Natepute

नातेपुते येथे १३ डिसेंबर पासून  अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन  


 नातेपुते प्रतिनिधी : नातेपुते येथील  श्री विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह नातेपुते वै. ह भ प गुरुवर्य मनोहर महाराज भगत पुण्यतिथी सोहळा व भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन बुधवार दि. १३ डिसेंबर ते मंगळवार दि.१९ डिसेंबर या दरम्यान पुण्यतिथी सोहळा व हरिनाम सोहळ्याचे ग्रामस्थांच्या सहकार्यातून आयोजन करण्यात आलेले आहे.

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकडारती दुपारी महिला भजन सायंकाळी हरिपाठ आणि रात्री ८ ते १० कीर्तन  सप्ताहातील कीर्तन महोत्सव दि.१३ डिसेंबर रोजी  ह.भ.प. संतोष महाराज लहाने,आळंदी, दि.१४ डिसेंबर रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम आळंदी, दि. १५ डिसेंबर रोजी ह.भ.प. संतवीर बंडातात्या कराडकर, संस्थापक व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र, शनिवार दि.१६ डिसेंबर रोजी वै. ह.भ.प. गुरुवर्य, मनोहर महाराज भगत पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने सकाळी १० ते १२ यावेळेत फुलाचे कीर्तन ह भ प, गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देहू यांची किर्तनसेवा होईल व नंतर महाप्रसाद होईल व रात्री ८ ते १० ह भ प,कैलास महाराज केंजळे धर्मपुरी, दि.१७ डिसेंबर रोजी ह.भ.प. गुरूवर्य अशोक महाराज जाधव जुन्नर, दि.१८ डिसेंबर  रोजी ह.भ.प.दयानंद महाराज कोरेगावकर कर्जत,दि.१९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत काल्याचे किर्तन ह.भ.प. सुनील महाराज माने तावशी, यांचे होईल व कीर्तनानंतर महाप्रसाद होईल. दि.१४ डिसेंबर रोजी सायंकाळी ह भ प, डाॅ. उदय नारायण पेंडसे भोर यांची प्रवचन सेवा होईल, 

तरी या सर्व कार्यक्रमांस परिसरातील भाविक भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या श्रवण सुखाचा धार्मिक आनंद लुटावा, असे आवाहन अखंड हरिनाम सप्ताह समिती व समस्त ग्रामस्थ नातेपुते तसेच श्रीराम महाराज भगत नातेपुते यांच्यावतीने करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments