जुन्या वादातून कुटुंबावर हल्ला,चार जणाविरूध्द गुन्हा नोंद
तुळजापुर तालुक्यातील घटना
धाराशिव :मागील भांडणाची कुरापत काढून महेश तिच्या कुटुंबाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली ही घटना शनिवारी दिनांक 16 रोजी 9 वाजेच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथे घडली .
याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की आरोपी संतोष जालींदर गायकवाड, जालींदर नामदेव गायकवाड, भरत नामदेव गायकवाड, सुरेश नामदेव गायकवाड सर्व रा. देवकुरुळी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 16 रोजी 9 वा. सु. देवकुरुळी येथे फिर्यादी नामे-रुक्मीनी वसंत गायकवाड, वय 50 वर्षे, रा. देवकुरुळी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचा मुलगा संजय गायकवाड यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण केली. तसेच फिर्यादी व त्यांचे पती वसंत, सुन सारीका पुतण्या संतोष हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादीच्या पुतण्यास लोखंडी रॉडने व अंगावर चटणी टाकून मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- रुक्मीनी गायकवाड यांनी दि.17.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 452, 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे
_______________________________________________
0 Comments