धाराशिव- हनुमंत आप्पाच्या पुढाकाराने सांजा गावकऱ्यांना वीज उपलब्ध
धाराशिव (प्रतिनिधी) सांजा ता.जि. धाराशिव येथे हनुमंत आप्पा सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने डीपी लाईन उभारणीचे काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांना विद्युत पुरवठा होण्यास मदत झाली आहे.
सांजा या ठिकाणी हनुमंत अप्पा सूर्यवंशी आणि महावितरण कंपनीच्या पुढाकारातून दोन डी.पी.एल.टी लाईन उभारण्यात आली आहे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू होता. हे काम पूर्ण झाल्याने महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री वडने यांच्या उपस्थितीत नुकतेच डी.पी. लाईनचे उद्घाटन झाले आहे. हनुमंत आप्पा सूर्यवंशी यांच्या प्रयत्नामुळे सांजा गावकऱ्यांना आता मुबलक स्वरूपात वीज उपलब्ध होणार असल्याने जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
0 Comments