Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने भिक मांगो आंदोलन

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने भिक मांगो आंदोलन

तुळजापुर : तुळजापूर तालुका तामलवाडी येथिल प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने भिक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे ग्रामपंचायत तामलवाडी यांच्या वतीने दिव्यागांचा देण्यात येणारा पाच टक्के निधीचे वाटप गेली पाच वर्षा पासून अद्याप कसलाही प्रकारचे वाटप केले जात नाही याबाबत प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने दिनांक :०३/०२/२०२३ व १४/०७/२०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय यांना अर्ज सादर केले होते तसेच दिनांक:२७/०७/२०२३ रोजी गटविकास अधिकारी साहेब तुळजापूर यांनाही पत्रव्यवहार करून पाच टक्के निधी वाटप होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले परंतु तामलवाडी ग्रामपंचायतला वेळोवेळी मागणी करुनही मागील पाच वर्षांपासून दिव्यांगाचा पाच टक्के निधीचे वाटप होत नाही.

   दिनांक -०३/१२/२०२३ रोजी जागतिक अपंग दिन आहे या जागतिक अपंग दिनानिमित्त तामलवाडी येथिल सर्व दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी मिळत नसल्याने गावांमध्ये भिक मांगो आंदोलन करणार आहे .ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी यांना वारंवार लेखी व तोंडी सांगूनही पाच टक्के निधीचे वितरित होत नसल्यानेच प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने भिक मांगो आंदोलन छेडणार असल्याचे प्रहार संघटनेचे तालुका संघटक सचिन अशोक शिंदे यांनी सांगितले व याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी राहीलं

   जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने गटविकास अधिकारी साहेब यांनी ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी यांच्या मार्फत दिला जाणार पाच टक्के निधीचे वाटप करावे अन्यथा आंदोलन अटळ आहे असे तामलवाडी येथिल प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments