धाराशिव : सरकारी शाळेतील सर्व शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश द्या -ॲड रेवण भोसले
धाराशिव दि 2: विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी व शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारी शाळेतील सर्व शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता पूर्णपणे ढासळली आहे .गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण न दिल्यामुळे एक पिढीच बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. गोरगरीब, शेतकरी ,शेतमजूर व कष्टकरी कामगारांचे मुलं सरकारी शाळेत शिकतात. त्यांना योग्य शिक्षण मिळत नाही .कारण शिक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे शिक्षकांचा बहुतांश वेळ जाण्या-येण्यातच जातो. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना 60 ते 1 लाख रुपयांपर्यंत पगार दिला जातो परंतु विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. शिक्षक व पदवीधर आमदार हे फक्त शासनाने पांढरे हत्ती पोहोचण्यासारखेच आहे. हे दोन्ही प्रकारचे आमदार शिक्षकांना बेकायदेशीर धंदे करण्यात प्रोत्साहन तर देतातच उलट त्यांचे संरक्षण करतात. त्यामुळे अशा बिनकामाचे आमदारांची पद रद्द करणे हेच जनहिताचे आहे. तसेच बी. एल .ओ., गटशिक्षणाधिकारी ,शिक्षणाधिकारी हे कसलेही प्रकारची तपासणी न करता खोटे रिपोर्ट तयार करतात .हे सर्व जणच शिक्षकांच्या गैरकत्यात सहभागी असतात. त्यामुळे त्यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. तरी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी व शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारी शाळेतील सर्व शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात यावेत तसेच जे शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत त्यांचा पगार बंद करण्यात यावा असे स्पष्ट मत ॲड भोसले यांनी व्यक्त केले.
0 Comments