Hot Posts

6/recent/ticker-posts

लोहारा येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची आढावा बैठक संपन्न

लोहारा येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची आढावा बैठक संपन्न 


धाराशिव :लोहारा येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची आढावा बैठक घेण्यात आली ही बैठक जगदंबा मंदिर लोहारा येथे घेण्यात आली. भाजप नेते आमदार श्री राणाजगजितसिंह पाटील, मा. आ. श्री सुजितसिंह ठाकूर साहेब, जिल्हाध्यक्ष श्री संताजी चालुक्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी, विश्वकर्मा योजना, युवा मोर्चा कार्यकारिणी गठीत करणे आदीं विषयावर चर्चा झाली. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री राजसिंह राजेनिंबाळकर, यांनी या युवा मोर्चा बैठकीस मार्गदर्शन केले ,युवा मोर्चा शाखा प्रत्येक गावात ,नव कार्यकारणी निवडप्रक्रिया ,मन कि बात , सरल ऍप ,नमो ऍप , बूथ सक्षमीकरण तसेच आगामी निवडुकीच्या पार्श्वभिमीवर युवामोर्चाची रणनीती यावर सखोल मार्गदर्शन केले, यावेळी तालुकाध्यक्ष श्री शिवशंकर हत्तरगे, जिल्हा कोषाध्यक्ष श्री नेताजी शिंदे ,विस्तारक (उमरगा-लोहारा) श्री सिद्धेश्वर माने, श्री प्रमोद पोतदार, कमलाकर सिरसाट, बालाजी चव्हाण, दगडू तिगाडे, संपत देवकर, शुभम साठे, विरेंद्र पवार, बाबा सुंबेकर, विष्णू लोहार, मनोहर अण्णा, शिवा थोरात, प्रशांत माळवदकर, बालाजी सोनटक्के, नागनाथ भुजबळ, निकेश बचाटे, इतर तालुका कार्यकारिणी सदस्य, सुपर वारीअर्स व बूथ प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments