संताजींचे विचार पुढील पिढीला समजावण्यासाठी पुढाकार घ्यावा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंम्बासे
धाराशिव : शहरातील संताजी जगनाडे महाराज चौक येथे राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 399 व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन धाराशिव जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंम्बासे यांच्या हस्ते जन्मोत्सव साजरा करून अभिवादन करण्यात आले.*याप्रसंगी तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,जनता बँकेचे माजी चेअरमन विश्वास आप्पा शिंदे,माजी नगराध्यक्ष राजाभाऊ घोडके,दत्ता बंडगर,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संजय देशमुख,भारत डोलारे,पत्रकार संतोष हंबीरे,जिल्हा सचिव अँड विशाल साखरे,जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले,ह.भ.प.मुकुंद महाराज कोरे,यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ सचिन ओंम्बासे म्हणाले नवीन पिढीला चांगल्या संस्काराची गरज आहे.संताजींचे विचार त्यांची पुस्तके वाचण्यासाठी आवड निर्माण केली पाहिजे.यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ओंम्बासे यांनी केले.संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरु तुकोबांरायांचे अभंग आपल्या प्रयत्न पोहचलेत.संताजींना अक्षर ओळख, गणित असं बर्यापैकी शिक्षण मिळालं संताजी अत्यंत तल्लख बुद्धीमत्तेचे होते.त्यांची निरीक्षण अत्यंत सुक्ष्म असायची अशा संताजींचे विचार लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकांनी करावे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंम्बासे यांनी केले.
याप्रसंगी नगरसेवक युवराज नळे,खलिल सय्यद,मैनोद्दिन पठाण,सिध्दार्थ बनसोडे,अँड खंडेराव चौरे, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, प्रविण कोकाटे,नितिन शेरखाने,प्राचार्य डॉ अनिल देशमाने,शिवानंद कथले,सतिश कदम,पांडुरंग लाटे, मुकेश नायगावकर,धनंजय राऊत, सुनिल शेरखाने, महादेव माळी,अँड गणपती कांबळे,सुनिल काळे,विशाल मिश्रा,लक्ष्मण निर्मळे,मंगेश जवादे,शिवलिंग होनखांबे,चंद्रकांत मेंगले,गणेश घोडके,प्रविण घोडके,कपिल नवगिरे,प्रमोद मेंगले,नागेश निर्मळे,यांच्यासह सर्व समाजातील प्रतिनिधी व समाज बांधव यांची उपस्थिती होती.
0 Comments