Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मल्लिकार्जुन खर्गे व प्रियंका खर्गे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध -Protest by burning symbolic effigy of Mallikarjun Kharge and Priyanka Kharge on behalf of Bharatiya Janata Yuva Morcha at Dharashiv

धाराशिव येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मल्लिकार्जुन खर्गे व प्रियंका खर्गे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन  निषेध -

धाराशिव : शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजपा व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने स्वातंत्र्यवादी सावरकर यांच्या बद्दल  कर्नाटक काँग्रेस चे मंत्री  प्रियंक मल्लिकार्जुन खर्गे यानी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ  मल्लिकार्जुन खर्गे व प्रियंक खर्गे याचा  प्रतिकात्मक पुतळयाला जोडे मारून जाळण्यात आले. 

कर्नाटकचे कॉग्रेसचे मंत्री प्रियंक खर्गे हे हिंदु  द्वेषा पोटी सावरकर यांच्या विरोधात सातत्याने चुकीचे व निषेधार्थी वक्तव्य करतात. सातत्याने होत असलेल्या टिकेमुळे भाजपा युवा मोर्चा धाराशिव  यांच्या वतीने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन दहन करण्यात आले. महाराष्ट्रातील  उध्दव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे हे मूग गिळून गप्प का आहेत? हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना गुरु स्थानी मानत आज त्यांच्या मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व त्यांच्या पक्षातील सर्व नेते मंडळी खालच्या पातळीवर जाऊन टिका – टिपणी करत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मुग गिळुन गप्प  का आहे. असा प्रश्न सर्व हिंदुप्रेमीच्या मनात निर्माण झाला आहे.

यापुढे आमच्या कोणत्यांही श्रध्दा स्थाना विषयी टिका- टिपणी केली तर भारतीया जनता युवा मोर्चा त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही.

हे आंदोलन  भाजपा माजी अध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले

यावेळी प्र.का.स. प्रविण पाठक, युवराज नळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काकडे, भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे, अभिजीत काकडे, पंडीत मंजुळे, दुर्गाप्पा पवार, रमण जाधव, अमोल राजेनिंबाळकर, सचिन लोंढे, दत्ता पेठे, स्वप्नील नाईकवाडी, अमित कदम, प्रसाद मुंडे, गणेश एडके, धनराज नवले, नवनाथ सोलंनकर, सार्थक पाटील, गणेश मोरे,  नरेन वाघमारे,  किशोर पवार, राजकुमार भाऊ पवार, सौरभ काकडे, व्यंकटेश कोळी, ओंकार देवकते, शंकर मोरे, अमीर सौदागर, पुष्पकांत माळाळे, मेसा जानराव, अमोल पेठे, आनंद भालेराव, शेषेराव उंबरे, नामदेव नायकल, गणेश गोरे, रोहित देशमुख,‍ अजिंक्य राजेनिंबाळकर, सुनिल पंगुडवाले इत्यादी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते ,पदाधिकारी आंदोलनावेळी उपस्थित होते .


 


Post a Comment

0 Comments