जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली भूम परंडा व वाशी पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. महेंद्र काका धुरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली व भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भूम परंडा व वाशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज यशस्वीरित्या पार पडली.
आज (दि.19) वाशी तसेच भूम येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली व भूम परंडा वाशीचे विधानसभा अध्यक्ष नवनाथ अप्पा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दि.24 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या मा.सुरेश दाजी बिराजदार, प्रदेश उपाध्यक्ष यांच्या संकल्पनेतील भव्य अशा रोजगार मेळावा याबाबत भूम परंडा व वाशी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकिमध्ये होणाऱ्या मेळावा संदर्भात चर्चा झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी बोलताना असे म्हणाले की मा.सुरेश दाजी बिराजदार यांच्या संकल्पनेतून भूम परंडा वाशी येथील युवक युवतींसाठी भव्य असा रोजगार मेळावा दिनांक 24 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला असून या मेळाव्यामध्ये पन्नास हून अधिक नामांकित कंपन्या रोजगार घेऊन आपल्या तालुक्यामध्ये येणार आहेत.यामुळे हजारो युवक व युवतींना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे युवक व युवतींना या मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाशी व परंडा नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
वाशी युवक तालुका उपाध्यक्षपदी सुशांत बळीराम नाळपे, वाशी युवक तालुका संघटक पदी सुरज गव्हाणे,
वाशी युवक तालुका सरचिटणीस पदी राजेंद्र रावसाहेब गाढवे,
वाशी युवक तालुका उपसंघटक पदी योगेश अभिमान इंगोले,
पारगाव युवक शहराध्यक्ष पदी प्रवीण हनुमंत पुरी यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब काटवटे यांच्या नेतृतवाखाली या निवडी जाहीर झाल्या.
तसेच भूम शहराध्यक्ष पदी जीवन दिगंबर गाढवे, भूम अल्पसंख्यांक शहराध्यक्ष पदी आदिल जलाल शेख यांची जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते निवडी चे पत्र देण्यात आले.
आढावा बैठकीमध्ये प्रमुख नेते यांनी आपले मनोगत व्यक्त केले व उपस्थित कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ अप्पा जगताप,भूम तालुकाध्यक्ष ॲड.रामराजे बी साळुंके, वाशी तालुकाध्यक्ष ॲड. सूर्यकांत सांडसे, परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे,परंडा शहराध्यक्ष जावेद पठाण, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, महेश नलावडे, भूम युवक तालुकाध्यक्ष दादासाहेब निरफळ, वाशी युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब काटवटे, भूम युवक तालुकाध्यक्ष दादासाहेब निरफळ, भूम तालुका युवक कार्याध्यक्ष संदीप गटकळ,उपाध्यक्ष ॲड.मुंडे, परंडा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जहांगीर शेख,नगरसेवक भगवतराव कवडे,शिवशंकर चौधरी,नगर सेवक विकास पवार,बापूराव जगदाळे,जालिंदर जगदाळे, अंगद जगदाळे, गणेश माने,जितेंद्र निरफळ, संदिप गटकळ,नीरज सपकळ, तानाजी नाईकवाडी, सरिफ मुजावर, रीहाल शेख, असलम मुजावर,बच्चन तांबे,अब्दुल पठाण,संदीप खरवडे आदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.
____________________________________________
0 Comments