सोलापुर : बाळे शिक्षक पतसंस्थेस तातडी कर्जाची मर्यादा ८० हजार पर्यंत मंजूर - चेअरमन सुरेश गुंड
सोलापूर प्रतिनिधी - बाळे येथील सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना तातडीने तातडी कर्ज ८० हजार रूपये मंजूरीचा आदेश व साधारण कर्जाची परतफेड दोनशे हप्त्यांत केल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन सुरेश गुंड यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर व दिडशे कोटींची उलाढाल असलेली पतसंस्था फक्त शिक्षक शिक्षकेतर सेवकांची आहे. पतसंस्थेच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामकाजामुळे महाराष्ट्रात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मा.शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे. मा.शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर व सर्व संचालक, सभासद यांच्या उपस्थितीत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक सभासदांच्या मागणीनुसार तातडी वाढ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यास अनुसरून ज्या सभासदास मासिक पगार 50 हजारांपर्यंत असेल त्यांना 30 हजार, मासिक पगार १ लाखांपर्यंत असेल तर ६० हजार व १ लाखाच्या पुढे असेल तर ८० हजार मंजूर करून ताबडतोब खात्यावर जमा केले जातील. या तातडीची फेड १२ महिन्यात असेल. तसेच याच महिन्यात या पतसंस्थेचे कार्यक्षेत्र जिल्ह्यावरून राज्यस्तरीय करण्याचा ठराव मंजूर झालेला असून लवकरच आयुक्तांकडे पाठवून त्यास मंजुरी घेतली जाईल. त्याचप्रमाणे भविष्यात आपल्या सभासदांना पतसंस्थेकडून कर्जाची मर्यादा वाढवून कर्ज वाटप करता यावे याबाबत संचालक मंडळ प्रयत्नशील असल्या ची माहिती पतसंस्थेचे चेअरमन सुरेश गुंड यांनी दिली. तातडी कर्ज मर्यादेत वाढ झालेने सभासदातुन समाधान व्यक्त होत आहे.
0 Comments