Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव :भारतीय जनता युवा (bhartiya janta morcha)मोर्चाच्या वतीने धाराशिव(dharashiv) जिल्ह्यात नवमतदाता संमेलन उत्साहात संपन्न

धाराशिव :भारतीय जनता युवा (bhartiya janta morcha)मोर्चाच्या वतीने  धाराशिव(dharashiv) जिल्ह्यात नवमतदाता संमेलन उत्साहात संपन्न
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिव जिल्ह्यातील 6300 नव युवक ,नवमतदाता यांच्याशी व्हीडीओ  कॉन्फरन्स च्या माध्यमातुन संवाद साधला 

धाराशिव : भारत हा तरुणांचा देश असून ज्या देशाचा तरुण सक्षम आणि जागरूक त्या देशाची प्रगती अत्यंत वेगाने होते त्यामुळे देशाला अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी आणि आपल्या चैतन्यशील लोकशाहीशी त्यांचा संबंध दृढ करण्यासाठी नवीन मतदारांच्या महत्त्वावर व सहभागावर सातत्याने भर दिला असुन लोकशाहीच्या मजबुतीसाठी तरुणांचा सहभाग हा नेहमीच महत्वपूर्ण आहे या उद्देशाचा पाठपुरावा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे पी नड्डा जी, युवा मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष खा.श्री तेजस्वी सूर्याजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात तर कर्तुत्वान उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस तथा प्रभारी विक्रांत पाटील, भाजयुमो महाराष्ट्र अध्यक्ष राहुल लोणीकर, आ.श्री. राणाजगजितसिंह पाटील, माजी आ. सुजितसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हयात चारही विधान सभा क्षेत्रातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दि.२५ जानेवारी २०२४ रोजी नवमतदाता संमेलन आयोजित केला. धाराशिव शहरातील के.टी पाटील B फार्मसी कॉलेज, तेरणा इंजिनिअरिग कॉलेज, महाजन कॉलेज व तेरणा महाविद्यालय या सह जिल्हयातील विविध ठिकाणी आयोजीत केलेले संमेलन जे प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना उज्ज्वल भारताच्या भविष्यासाठी प्रेरित करणरे आहेत.  तसेच येणाऱ्या काळात तरुणांच्या कर्तुत्वामुळे देश हा जगात  तिसऱ्या क्रंमाकावार प्रगती पताच्या बाबतीत राहील असे पंतप्रधान मोदीजी यांनी संबोधित केले . 

नवमतदाता संमेलनाचे उद्दिष्ट हे नवीन मतदारांना देशाची लोकशाही प्रबळ बनवण्यासाठी मार्गदर्शन करणे, त्यांची नोंदणी करणे, त्यांना योग्य दिशा देऊन लोकाभिमुख तरुण घडवणे हा आहे, जेणेकरून आपल्या चैतन्यशील लोकशाहीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढेल यासाठी युवा मोर्चा प्रयत्नशील आहे. संमेलनांसाठी संवेदनशील नवमतदाता जोडण्यासाठी आणि त्यांची नोंदणी करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने शैक्षणिक संस्था आणि युवा संघटनांपासून घरोघरी, क्रीडांगणे आणि कोचिंग सेंटर्सपर्यंत व्यापक प्रचार व प्रसार केला आहे. ज्यामुळे तरुणांना अनुकूल असलेल्या सर्व मार्गांने व्यापक कव्हरेज सुनिश्चित करण्यात आले असून नवमतदात्याला विकसित भारत दूत म्हणून जबाबदारी देण्यासाठी आणि नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, तरुणांमध्ये भारतीय नागरिकत्वाच्या जबाबदारीची भावना आणि तरुणांची राजकारणातील सक्रियता या बाबींना प्रोत्साहन दिले जाणार आहे अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी दिली.  

यावेळी नवमतदाता समेंलनास महाराष्ट्र व गोवा बार कॉन्सील अध्यक्ष  ॲड.मिलींद पाटील, लोकसभा निवडणुक प्रमुख नितीन काळे, आदर्श शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री सुधीर आण्णा पाटील, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रविण पाठक, भाजपा सरचिटणीस इंद्रजित देवकते, युवा मोर्चा विधानसभा संयोजक तथा कार्यक्रमाचे आयोजक अभिराम पाटील व के टी पाटील कॉलेज चे प्राचार्य. डॉ. अमोल जोशी, डॉ. आजित माशाळकर, यांचे विशेष सहकार्य झाले ,दतात्रय देशमुख, लिंबराज साळुंखे ,ओम नाईकवाडी, रोहित देशमुख, सलमान शेख ,गणेश इंगळगी ,प्रसाद मुंडे, धनराज नवले, अजय उंबरे ,सार्थक पाटील ,सुनील पंगुडवाले ,सुजित उंबरे ,माधव पाटील ,आशीश येरकळ, जगदिश जोशी, शिवानी परदेशी यांच्या सह नवमतदाता युवक व युवती यांच्या सह युवा मोर्चा कार्यकर्ते  या वेळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.



Post a Comment

0 Comments