Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव: श्रीपतराव भोसलेमध्ये 'डिजिटल व वित्तीय साक्षरता' शिबिर

 धाराशिव: श्रीपतराव भोसलेमध्ये 'डिजिटल व वित्तीय साक्षरता' शिबिर संपन्न 

धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, धाराशिवमध्ये श्री. निलेश उबाळे, करिअर कौन्शील डिजीटल साक्षरता अभियान, महाराष्ट्र शासन यांचे 'डिजिटल व वित्तीय साक्षरता' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.  कार्यक्रमाचे अध्यक्षपद कला व वाणिज्य विभाग प्रमुख श्री. एन. आर. नन्नवरे सर यांनी भूषविले.  श्री. उबाळे यांनी त्यांच्या व्याख्यानात येणारा सध्याचा काळ हा डिजिटल होत असल्यामुळे आपण त्यात मागे राहिलोत तर आपल्याला त्याचा लाभ घेता येणार नाही व इतर लोकांकडून आपली फसवणूक होऊ शकते यासाठी आर्थिक डिजिटल व्यवहाराची माहिती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या धावपळीच्या जगात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व्यवहार कसे करावेत, ते करताना कशा प्रकारची काळजी घ्यावी, गुंतवणूक कशी करावी, युपीआय सारख्या प्रणालीचा काळजीपूर्वक वापर कसा करावा या विषयीचे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी दैनिक सहयाद्रीचे पत्रकार श्री. अमित गोरे, प्रोजेक्ट हेड श्रीमती स्नेहा सपकाळे, साक्षरता अभियान महाराष्ट्र शासन समन्वयक श्री. कृष्णा यादव यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एस. देशमुख सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, उपमुख्याध्यापक श्री. एस. बी. कोळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यालयातील शिक्षक श्री. एम. पी. काळे सर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री. एस. व्ही. पाटील सर, श्री. बी. एस. नन्नवरे सर, श्री. ए. जे. खुने सर, श्री. एस. आर. जाधव सर, सौ. एस. एल. जाधव मॅडम, सौ. वाडकर मॅडम, सौ. शेळके मॅडम आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. डी. वाय. घोडके सर यांनी केले तर आभार श्री. एल. एस. शिंदे सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील सर व प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील सर यांचे सहकार्य लाभले.


Post a Comment

0 Comments