तुळजापुर येथे तालुका बाल संरक्षण समितीची बैठक संपन्न
धाराशिव,दि.२९: तुळजापूर येथे तालुका बाल संरक्षण समितीची बैठक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये बालविवाह संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच बालकांबाबत असलेल्या विविध समस्या प्रत्येक विभागाने मांडल्या. त्याविषयी चर्चा केली. चर्चेमध्ये प्रामुख्याने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. त्याच पद्धतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी तुळजापूर श्री. कोरे यांनी बाल भिक्षेकरी यांच्या बंदोबस्ताबाबत नियोजन केले. तसेच श्री. कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून मंदिर परिसरातील सहा बालभिक्षेकरी ताब्यात घेण्यात आले व ते बालकल्याण समितीसोबत सादर करण्यात आले.
0 Comments