जीवनामध्ये स्वयंशिस्त, कष्ट व वेळेचे नियोजन महत्त्वाचे - मुख्याध्यापक अमोल फुले
अकलूज प्रतिनिधी - अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय विभागातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत असतात. त्यांचा सर्वांना आयुष्यात खूप उपयोग होतो. आपण सुशिक्षित होत असताना सुसंस्कारित होणेही महत्त्वाचे असते. मुलांनो करिअर संदर्भात वेगळ्या वाटा शोधा, निवडा. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त, कष्ट व वेळेचे नियोजन करा आणि करिअर करा असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी मांडले.
प्रास्ताविकात 'छडी वाजे छमछम, विद्या येई घमघम’, असा शाळेचा प्रवास कधी संपतो हे ध्यानातच येत नाही. शाळा संपून आता कॉलेजमधील शिक्षण सुरू होणार याची चाहूल लागते ती शाळेतल्या या निरोप समारंभात. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आठवणींना जसा उजाळा मिळतो, तसे पुढील करिअरसाठी ‘बेस्ट लक’ हे शब्द पाठबळ देऊन जातात. वर्षभर झालेल्या उपक्रमांची माहिती दिली. कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात नाव उज्ज्वल करा असे मत उपप्राचार्य संजय शिंदे यांनी मांडले. विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्याध्यापक अमोल फुले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे, विनायक रणवरे यांचा व या वर्षात सेवानिवृत्त होत असलेले प्राध्यापक संजय नागणे, हेमंत पाटील, रघुनाथ घुले, सिद्धेश्वर साठे, सेवक अंकुश भाट व हनुमंत सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
निरोप समारंभाच्या वेळी स्तुती कंपली, वैष्णवी पवार, सानिया तांबोळी, साक्षी मुंडफणे, पूजा देवकर, रूकया बागवान, मारिया पठाण, गौरी शेंडगे व विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी प्रेरणा गायकवाड यांनी शिक्षकांविषयी आपल्या मनोगतात कृतज्ञता व्यक्त केली. नवीन शैक्षणिक धोरणातातील बदल, काय अभ्यासक्रम असेल, कसा असेल तसेच कौशल्य आधारित शिक्षण याची माहिती स्कूल कनेक्ट अभियानांतर्गत शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज चे डाॅ जनार्धन परकाळे यांचे व्याख्यान झाले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झाकीर सय्यद सर यांनी केले.
0 Comments