कळंब तालुका पत्रकार मंडळाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भाजपाच्या वतीने सत्कार
कळंब /प्रतिनिधी: कळंब तालुका पत्रकार मंडळाची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली त्या कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार शुक्रवारी कळंब भा.ज.पा कार्यालयात करण्यात आला अधिक वृत असे की कळंब तालुका पत्रकार मंडळाची नवीन कार्यकारणी संस्थापक उन्मेष पाटील व तालुका अध्यक्ष धनंजय घोगरे यांनी नुकतीच जाहीर केली त्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार शुक्रवारी कळंब तालुका भा.ज.पा अध्यक्ष अजित पिंगळे व धाराशिव जिल्हा भा.ज.पा उपाध्यक्ष संजय घोगरे यांच्या हस्ते करण्यात आला ते पदाधिकारी पार्श्वनाथ बाळापुरे ता.कार्याध्यक्ष समीर मुल्ला ,ता.उपाध्यक्ष प्रवीण तांबडे, सहकोषाद्यक्ष,विकास कदम , ता.कोषाध्यक्ष श्रीकांत बरकते सहसचिव या सर्वांचा सत्कार पिंगळे व घोगरे यांनी केला व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी कळंब तालुका पत्रकार मंडळाचे अध्यक्ष धनंजय घोगरे, लक्ष्मण (तात्या)मोहिते,नारायण टेकाळे,बाळासाहेब पवार,युवराज धाकतोडे,संजय गरड,सागर घोगरे,उमेश एडके,अनिकेत पारवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments