Hot Posts

6/recent/ticker-posts

कळंब : अमर चोंदे ,अश्रुबा कोठावळे, आकीब पटेल ,यांना आदर्श दर्पण सेवा गौरव पुरस्कारने सन्मानित

कळंब : अमर चोंदे ,अश्रुबा कोठावळे, आकीब पटेल ,यांना आदर्श दर्पण सेवा गौरव पुरस्कारने सन्मानित       

             

कळंब/ भिकाजी जाधव :- दर्पण दिनाच्या निमित्ताने पुरस्कार सेवा समिती कळंब च्या वतीने दिनांक १० जानेवारी रोजी संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तनिवेदिका नम्रता वागळे (पुढारी न्युज) प्रसिद्ध राजकीय विश्लेषक अभय देशपांडे ,प्रसिद्ध कवी व दैनिक लोकसत्ता चे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी रवींद्र केसकर, दैनिक एकमतचॆ जिल्हा प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार अनंत अडसूळ यांच्या हस्ते अमर भारत चोंदे (दै.समय सारथी )आश्रुबा अंकुश कोठावळे  (साहित्यिक, दैनिक अक्षरधारा )अकिब नय्युम पटेल (महाराष्ट्र प्राईम न्यूज जिल्हा प्रतिनिधी )यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी नम्रता वागळे यांनी ग्रामीण भागातील पत्रकार आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज व ग्रामीण भागाचे प्रश्न  मांडतात त्याची दखल घेत समाजसेवी   महादेव महाराज अडसूळ हे पुरस्कार सेवा समितीच्या वतीने पत्रकारांचा पुरस्कार देऊन गेली १४ वर्ष गौरव करीत आहेत त्यांच्यासारखी निः स्पृह सेवा करणारे समाजसेवी कमी भेटतात मोठ्या अडचणीतूनअनाथ बालकांचा ते सांभाळ करीत आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे असे सांगून नम्रता वागळे यांनी या कार्यासाठी मदत व सहकार्य करण्याची तयारी दर्शविली व महादेव महाराज अडसूळ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या समाजसेवी कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या  प्रतिवर्षी पुरस्कार सेवा समिती कळंबच्या वतीने ६ जानेवारी  दर्पण दिना निमित्त कळंब तालुक्यातील सामाजिक, आरोग्य ,क्रीडा ,शोध वार्ता ,या विषयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा आदर्श दर्पण सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो गेली १४  वर्ष हे पुरस्कार देण्यात येत असून आज पर्यंत ३८ पत्रकारांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे  या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार सेवा समितीचे महादेव महाराज अडसूळ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाज वादक प्रताप आवाड यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे माजी उपसभापती दिलीपसिंह देशमुख, प्रसिद्ध साहित्यिक के.व्ही. सरवदे,पत्रकार परमेश्वर पालकर ,सतीश मातने ,लक्ष्मण शिंदे, हनुमंत पाटोळे ,ढोकी येथील पत्रकार सुरेश कदम ,संजय शिंदे, राजवर्धन भुसारे महावितरण चे संजय जाधव ,भा.ज.पा. ढोकी शहराध्यक्ष प्रभाकर गाढवे ,आश्रम संचालिका सरस्वती अडसूळ यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी तर आभार भारत जोशी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments